Manish Jadhav
कांदोळी समुद्रकिनारा (Candolim Beach) हा गोव्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. तो उत्तर गोवामध्ये स्थित असून, प्रसिद्ध कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेने शांत आणि कमी गर्दीचा आहे.
पांढऱ्या-सरसरीत वाळूचा विस्तृत कांदोळीचा किनारा पर्यटकांना भुरळ घालतो.
इतर गजबजलेल्या किनाऱ्यांच्या तुलनेत कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी तशी फार कमी असते.
पॅरासेलिंग, जेट-स्की, बॅनाना राईड, बोटिंग यांसारख्या सुविधा येथे आहेत.
कांदोळी किनाऱ्याजवळ आग्वाद किल्ला आहे, जो पोर्तुगीज काळातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.
समुद्रकिनाऱ्याजवळ विविध प्रकारचे लक्झरी आणि बजेट फ्रेंडली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
किनाऱ्यावर स्थानिक समुद्री खाद्यपदार्थ आणि थंडगार पेयांचे आस्वाद घेण्यासाठी शॅक्स आणि कॅफे.