Manish Jadhav
या बीचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार. आकाशातून पाहिल्यास हा किनारा हिंदू धर्मातील पवित्र 'ॐ' (ओम) चिन्हासारखा दिसतो, म्हणून याला 'ओम बीच' म्हटले जाते.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गोकर्ण शहरापासून जवळच हा किनारा आहे. पर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या गोकर्णमधील पाच मुख्य किनाऱ्यांपैकी हा एक आहे.
ओम बीचवर पर्यटकांना सर्फिंग, बनाना बोट राईड, जेट स्कीइंग आणि पॅरासेलिंग यांसारख्या रोमांचक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.
हा बीच इतर किनाऱ्यांशी डोंगररांगांनी जोडलेला आहे. ओम बीच ते कुडल बीच किंवा हाफ मून बीच असा बीच ट्रेकिंगचा अनुभव पर्यकांसाठी अविस्मरणीय ठरतो.
येथील सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत विलोभनीय असते. अरबी समुद्राच्या क्षितिजावर मावळणारा सूर्य पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळी येथे मोठी गर्दी जमते.
गोव्यातील किनाऱ्यांच्या तुलनेत ओम बीचवर अधिक शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. नारळाची झाडे आणि खडकाळ किनारा यामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.
किनारी भागात अनेक छोटे कॅफे आणि शॅक्स आहेत, जिथे तुम्ही दक्षिण भारतीय पदार्थांसह सी-फूडचा आस्वाद घेऊ शकता. 'नमस्ते कॅफे' हे येथील प्रसिद्ध ठिकाण आहे.
गोकर्ण रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडपासून रिक्षाने तुम्ही सहज ओम बीचला पोहोचू शकता. ऑक्टोबर ते मार्च हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो.