Manish Jadhav
पॅरिस ऑलिंपिकमधील पदक विजेती भारताची प्रमुख महिला नेमबाज मनू भाकर हिने गोव्यात यावेळच्या सुट्टीचा आनंद आपल्या मैत्रिणींसह लुटला.
मनूने गोव्यातील काही फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर अपलोड केले.
‘‘दिल चाहता है, माझ्या ग्रुपसोबत अजून एक गर्ल्स ट्रिप! त्यांच्यासोबतची ही पहिली ट्रिप, खूप आठवणी तयार झाल्या..’’ असे मनूने फोटोखाली कॅप्शन लिहिले.
मनू भाकर 23 वर्षांची असून गतवर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन ब्राँझपदके जिंकून तिने इतिहास घडवला होता.
एकाच ऑलिंपिकमध्ये एकपेक्षा जास्त पदके जिंकणारी ती देशाच्या स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ऑलिंपियन ठरली होती.
तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये, तसेच सरबज्योत सिंग याच्यासमवत मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ब्राँझपदक जिंकले होते.