गोमन्तक डिजिटल टीम
सात वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सह्याद्रीच्या पर्वत रांगात आणि त्यांच्या संलग्न प्रदेशात कारवी फुलायला लागते.
कारवी आपल्या सौंदर्याने केवळ माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील आपल्याकडे आकर्षित करते.
कारवीची पाने, फुले, खोड या गोष्टी माणसांना तसेच प्राण्यांना विविध प्रकारे उपयोगी पडतात.
कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.
कारवीच्या खोडाची साल वेदनाहारक असून, मुरड्यावर शेकण्यास व लाळ-ग्रंथीच्या दाहयुक्त सुजेवर बाहेरून लावण्यास उपयुक्त असते.
कारवीच्या फुलांचा महत्वाचा उपयोग म्हणजे त्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते.
कारवीची वनस्पतीची पाने जनावरांना खाऊ घालतात. हे गव्या रेड्यांचे विशेष खाद्य असते.
कार्वी वनस्पतीच्या काड्या मातीने लिंपून झोपड्यांच्या भिंती उभारल्या की झोपडीतील वातावरण थंड राहते.
कृमीकीटकांच्या विविध प्रजाती, रंगीबेरंगी फुलपाखरे फुलातील मधुरसाचा आस्वाद घेतात. कारवीची बोंडांवरील चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते