Manish Jadhav
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शव दर्शन सोहळ्याला गुरुवारी (21 नोव्हेंबर) ओल्ड गोव्यात सुरुवात झाली. या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव चर्चमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बासिलिका ऑफ बॉंम जिझस चर्चमधून मधून ते से केथेंड्रल चर्च परिसरात नेऊन विशेष उभारलेल्या तंबूत नेऊन ठेवले.
संत झेवियर यांची शव पेटी उचलण्यासाठी गोवा पोलिस खात्याचे 20 निरीक्षक नेमण्यात आले होते.
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवदर्शन सोहळ्याला राज्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली.
यंदा हा सोहळा 45 दिवस चालणार असून वाहतूक पोलिसांकडून कोंडी टाळण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. तसेच, पार्किंगचही सोय करण्यात आली आहे.