Sameer Amunekar
नुसता कोणताही फेस वॉश वापरण्याऐवजी ज्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकोलिक ॲसिड आहे असा फेस वॉश निवडा.
अनेकांना वाटते गरम पाण्याने तेल निघून जाईल, पण यामुळे त्वचा कोरडी पडते आणि उलट जास्त तेल तयार करू लागते. नेहमी कोमट किंवा गार पाण्यानेच चेहरा धुवा.
फेस वॉश केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात. ती बंद करण्यासाठी आणि त्वचेचा pH बॅलन्स राखण्यासाठी गुलाब पाणी किंवा अल्कोहोल-मुक्त टोनर नक्की वापरा.
"त्वचा तेलकट आहे मग मॉयश्चरायझर कशाला?" ही सर्वात मोठी चूक आहे. त्वचा हायड्रेटेड नसेल तर ती अधिक तेल सोडते. त्यामुळे Water-based किंवा Gel-based मॉयश्चरायझर वापरा.
मुलतानी माती किंवा 'काओलिन क्ले' असलेला फेस पॅक आठवड्यातून एकदा नक्की लावा. हे मास्क त्वचेच्या खोलवर साचलेले तेल आणि घाण शोषून घेतात.
दिवसभरात जेव्हा चेहरा तेलकट वाटेल, तेव्हा वारंवार चेहरा धुण्यापेक्षा ब्लॉटिंग पेपर (Blotting Paper) चा वापर करा. हे कागद मेकअप खराब न करता फक्त जास्तीचे तेल शोषून घेतात.
तेलकट आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या, ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि नैसर्गिक ग्लो येईल.