Oily Skin Care Guide: तेलकट त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी? 'मॉइश्चरायझर' वापरण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Sameer Amunekar

तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझर आवश्यक

अनेकांना वाटते की तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते. मात्र, योग्य मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि अतिरिक्त तेल निर्माण होण्यापासून मदत करते.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

चेहरा धुतल्यानंतर लगेच लावा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर 1-2 मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेत ओलावा चांगला लॉक होतो आणि त्वचा अधिक हायड्रेट राहते.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

Oil-Free आणि Gel-Based मॉइश्चरायझर निवडा

तेलकट त्वचेसाठी हलके, नॉन-कॉमेडोजेनिक (Non-Comedogenic) आणि जेल-बेस्ड मॉइश्चरायझर सर्वोत्तम ठरतात. हे त्वचेची छिद्रे बंद करत नाहीत.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

दिवसातून दोन वेळा वापरा

सकाळी चेहरा धुतल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे त्वचेचे संतुलन राखण्यास मदत करते.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

योग्य प्रमाणातच वापरा

मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात लावल्याने त्वचा अधिक चिकट दिसू शकते. मटाराच्या दाण्याएवढे प्रमाण संपूर्ण चेहऱ्यासाठी पुरेसे असते.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

SPF असलेले मॉइश्चरायझर दिवसा वापरा

दिवसा बाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले मॉइश्चरायझर वापरल्यास सूर्यकिरणांपासून संरक्षण मिळते आणि त्वचा निरोगी राहते.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादन निवडा

अल्कोहोलयुक्त किंवा जड क्रीम टाळा. त्वचेला सूट होणारे, त्वचारोगतज्ज्ञांनी शिफारस केलेले उत्पादन वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

Oily Skin Care Guide | Dainik Gomantak

तिखट पदार्थ खाल्ल्याने खरंच आयुष्य वाढतं का? खरं जाणून घ्या

Spicy Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा