गोमन्तक डिजिटल टीम
पाच ऑफबीट ठिकाणं
सप्टेंबरमध्ये गोवा समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि समृद्ध संस्कृतीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्याच्या अखेरीस परिसर हिरवागार होतो, पाहूया गोव्यातील पाच ऑफबीट ठिकाणं
आग्वाद किल्ला
हा सप्टेंबरमध्ये गोव्यातील एक शीर्ष आकर्षण आहे. 17 व्या शतकातील हा किल्ला अरबी समुद्र आणि किल्ल्याचा ऐतिहासिक दीपगृह देखील पाहण्यासारखे आहे.
गोव्याच्या मसाल्यांचे फार्म (Spice Farms Goa)
सप्टेंबरचा महिना गोव्यात मसाल्यांच्या वाड्यांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. या काळात वातावरण थंड आणि आल्हाददायक असते. विविध मसाल्यांच्या लागवडीबद्दल जाणून घेऊ शकता.
शापोरा किल्ला
हा किल्ला वागातोर बीच आणि अरबी समुद्राचे दृश्य देतो. शांत वातावरण आणि निसर्गसौंदर्यामुळे फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
सलीम अली पक्षी अभयारण्य
निसर्गप्रेमींनी सप्टेंबरमध्ये गोव्यातील हे ठिकाण चुकवू नये. मांडवी नदीच्या किनार्यावर चोडण बेटावर स्थित हे अभयारण्य पक्षीप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे. येथे किंगफिशर, बगुला आणि कॉर्मोरंट पक्षांचे ठिकाण आहे.
हणजूण फ्ली मार्केट
सप्टेंबरमध्ये गोव्यातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे स्थानिक हस्तकला, दागिने, कपडे आणि इतर वस्तूं पाहण्यास मिळतात. स्थानिक संस्कृतीत रमण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.