Offbeat Beaches: गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत! उन्हाळी सुट्टीसाठी 'ऑफबीट' समुद्रकिनाऱ्यांची यादी

Sameer Amunekar

तारकर्ली आणि मालवण

कोकणातील हे ठिकाण स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथले पारदर्शक पाणी आणि ऐतिहासिक सिंधूदुर्ग किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो. उन्हाळ्यात इथले 'सी-फूड' आणि मालवणी जेवण नक्कीच ट्राय करावे.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

पाळोले बीच (दक्षिण गोवा)

गर्दीपासून दूर आणि शांतता हवी असेल, तर गोव्यातील पाळोले बीच बेस्ट आहे. अर्धवर्तुळाकार आकाराचा हा किनारा आणि तिथल्या 'बीच हट्स'मध्ये राहण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. इथले 'कायकिंग' पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

राधानगर बीच (अंदमान-निकोबार)

जगातील सर्वोत्तम किनाऱ्यांच्या यादीत असलेल्या राधानगर बीचची पांढरी शुभ्र वाळू आणि निळेभोर पाणी तुम्हाला भुरळ पाडेल. उन्हाळ्यात इथले हवामान आल्हाददायक असते आणि फोटोग्राफीसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

वर्कला बीच (केरळ)

केरळमधील हा किनारा त्याच्या नैसर्गिक कड्यांसाठी (Cliffs) प्रसिद्ध आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले हे कडे आणि तिथून दिसणारा सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. इथे आयुर्वेदिक स्पा आणि योगाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

बाटा बीच (कर्नाटक)

गोकर्ण जवळ असलेला हा किनारा ट्रेकिंग आणि शांततेसाठी ओळखला जातो. ओम बीच किंवा कुडल बीचपेक्षा इथे गर्दी कमी असते. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर बाटा बीचला नक्की भेट द्या.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

पुरी बीच (ओडिशा)

धार्मिक प्रवासासोबतच समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल, तर पुरी हा उत्तम पर्याय आहे. जगन्नाथ मंदिराचे दर्शन घेऊन संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारता येतो. इथल्या वाळूशिल्पांचे (Sand Art) प्रदर्शन पाहण्यासारखे असते.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

महाबलीपुरम (तमिळनाडू)

इतिहास आणि समुद्र यांचा संगम म्हणजे महाबलीपुरम. इथला 'शोर टेम्पल' (Shore Temple) आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी छान आहे. इथले दगडी कोरीव काम आणि मंदिरे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.

Offbeat Beaches | Dainik Gomantak

सनस्क्रीन लावताना 'या' चुका टाळा

Summer Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा