Sameer Amunekar
अनेकजण सनस्क्रीन लावताना खूपच कमी क्रीम वापरतात. चेहऱ्यासाठी आणि मानेसाठी किमान 'दोन बोटांच्या' लांबीएवढे सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे, तरच सूर्याच्या किरणांपासून पूर्ण संरक्षण मिळते.
सनस्क्रीन लावल्या लावल्या त्याचे संरक्षण कवच तयार होत नाही. ते त्वचेमध्ये शोषले जाण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे.
अनेकांना वाटते की ऊन नसेल तर सनस्क्रीनची गरज नाही. पण ढगाळ हवामानातही सूर्याची अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणे त्वचेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे पाऊस असो वा ढग, सनस्क्रीन लावणे विसरू नका.
सनस्क्रीनचा प्रभाव साधारणपणे २ ते ३ तासांनंतर कमी होतो. जर तुम्ही सतत उन्हात असाल किंवा तुम्हाला जास्त घाम येत असेल, तर दर ३ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणे (Re-apply) अत्यंत गरजेचे आहे.
आपण चेहऱ्याची काळजी घेतो, पण कान, मान, हात आणि पाय यांकडे दुर्लक्ष करतो. उन्हात उघड्या राहणाऱ्या शरीराच्या प्रत्येक भागावर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे, अन्यथा टॅनिंग आणि रॅशेसचा त्रास होऊ शकतो.
जुन्या झालेल्या सनस्क्रीनचा प्रभाव संपलेला असतो. एक्सपायर झालेले सनस्क्रीन लावल्याने त्वचेवर खाज किंवा पुरळ येऊ शकते. त्यामुळे दर उन्हाळ्यात नवीन सनस्क्रीन खरेदी करणे केव्हाही चांगले.
जर तुमची त्वचा तेलकट (Oily) असेल आणि तुम्ही क्रीम-बेस्ड सनस्क्रीन लावले, तर पिंपल्स येऊ शकतात. तेलकट त्वचेसाठी 'जेल-बेस्ड' आणि कोरड्या त्वचेसाठी 'मॉइश्चरायझिंग' सनस्क्रीनची निवड करावी.