Manish Jadhav
हिवाळ्यात सकस आहार आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे.
हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आयुर्वेदमध्ये अनेक उपाय सांगितलेत.
आज (6 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून हिवाळ्यात बीन्सच्या शेंगा खाणं किती महत्त्वाचं आहे, हे जाणून घेणार आहोत.
बीन्सच्या शेंगांमध्ये असलेले पोषक तत्व हिवाळ्यात फायदेशीर ठरतात. या भाजीच्या सेवनामुळे शरीर निरोगी राहते. या शेंगांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे ए, ई तसेच लोह असते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीनच्या शेंगाची भाजी फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात.
हिवाळ्यात शरीराला उबदार आणि पोषक ठेवण्यासाठी बीन्सच्या शेंगांचा नियमित आहारात समावेश केला पाहिजे.