Manish Jadhav
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
‘एच-१बी’ व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अमेरिकेने सुरु केलेला पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. आता भारतीय प्रोफेशनल्संना व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी मायदेशी येण्याची गरज नाही.
नवी दिल्लीतील यूएस दूतावासाने सांगितले की, अमेरिका लवकरच व्हिसा नूतनीकरण कार्यक्रम सुरु करणार आहे, ज्याअंतर्गत एच-1बी व्हिसाधारक देश न सोडता त्यांच्या कागदपत्रांचे नूतनीकरण करु शकतील.
H-1B व्हिसाधारकांसाठी यूएस-आधारित नूतनीकरण कार्यक्रम यावर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. याचा फायदा भारतीय प्रोफेशनल्स आणि कामगारांना होईल.
सध्या भारतीय प्रोफेशनल्स आणि कामगारांना व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी मायदेशी यावे लागते. H-1B व्हिसाचे नूतनीकरण आणि रीफिल करण्यासाठी मायदेशी येणं ही चिंतेची बाब आहे.
अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाच्या तीन आठवड्यांपासून, 'H-1B' व्हिसावरुन वाद सुरु आहे.
ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी H-1B व्हिसाला सपोर्ट केला आहे.