गोमन्तक डिजिटल टीम
दिवाळीच्या दरम्यान थंडीची चाहूल सुरु होते, पण अजूनही हवी तशी हिवाळ्याची लक्षणे दिसत नाही आहेत.
नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे. थंडी कमी राहण्याचे संकेत आहेत.
वायव्य आणि पश्चिम मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमध्ये देशात सरासरीइतक्या पावसाची शक्यता आहे.
यादरम्यान दक्षिण भारतातील राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो.
नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात १२३ टक्क्यांपेक्षा अधिक, तर देशात ७७ ते १२३ टक्के पावसाची शक्यता आहे.
वर्षअखेरीस प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.