गोमन्तक डिजिटल टीम
विविधतेने नटलेला गोवा फिरणे हा एक आनंददायी अनुभव असतो.
गोव्यातल्या गोव्यात बाईकवरुन फिरण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच खास रस्त्यांची माहिती देत आहोत.
वाहणारी नदी आणि नारळाच्या झाडांच्या बागा यातून हा सुंदर मार्ग बघता येतो.
म्हापसापासून मांद्रे रस्ता उत्तरेत गोव्याच्या ग्रामीण भागाचा अनुभव देतो.
पणजी ते ओल्ड गोवा ही ऐतिहासिक आणि सुंदर राईड आहे. चर्चेस आणि प्राचीन स्मारकं यामुळे गोव्याचा वारसा अनुभवता येतो.
पणजीपासून पाळोळे पर्यंतचा रस्ता अरबी समुद्राच्या किना-याने जातो. समुद्राचा आनंद घेण्यासाठी हा मार्ग विशेष आहे.
मडगांवपासून केपेचा हा रस्ता संपूर्ण हिरवाईतून जातो. निसर्गप्रेमींसाठी हा रूट विशेष आकर्षण आहे.