Manish Jadhav
दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने इतिहास रचला.
त्याने जिनेव्हा ओपनच्या अंतिम फेरीत सहाव्या मानांकित ह्युबर्ट हुर्काझचा 5-7, 7-6, 7-6 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. ओपन एरामधील हे त्याचे 100 वे विजेतेपद आहे.
सामन्याच्या सुरुवातीला जोकोविच एका सेटने पिछाडीवर होता, पण नंतर सामन्यात पुनरागमन करत त्याने जेतेपद पटकावले.
नऊ महिन्यांपूर्वी पॅरिस ऑलिंपिकमध्ये जोकोविचने त्याच्या कारकिर्दीतील 99 वे एकेरी विजेतेपद जिंकले होते.
त्यानंतर त्याने शांघाय मास्टर्स आणि मियामी मास्टर्समध्ये भाग घेतला, पण त्या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्याच्या 38व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी त्याला 100 वे विजेतेपद जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. जिनेव्हा ओपन जिंकल्यानंतर जोकोविच म्हणाला की, येथे माझे 100 वे विजेतेपद जिंकल्याबद्दल मला आनंद होत आहे. यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली.
जोकोविचने 100 वे एकेरी विजेतेपद जिंकल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने त्याच्यासाठी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली.