स्मिथ-जोकोविच एकत्र खेळले टेनिस अन् क्रिकेट, Photo Viral

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियन ओपन 2024

14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मेलबर्न पार्कवर एक प्रदर्शनिय कार्यक्रम पार पडला.

Novak Djokovic | AFP

स्टीव्ह स्मिथची उपस्थिती

या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यामध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही समावेश होता.

Steve Smith | Dainik Gomantak

स्मिथ-जोकोविच खेळले टेनिस

विशेष म्हणजे स्मिथला 24 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचबरोबर टेनिस खेळण्याची संधीही मिळाली.

Novak Djokovic and Steve Smith | X/AustralianOpen

स्मिथने जोकोविचला केलं चकीत

जोकोविचच्या सर्व्हवर स्मिथने शानदार रिटर्न केल्याचे पाहून जोकोविचही आवाक झाला होता आणि त्याने स्मिथचे कौतुकही केले.

Novak Djokovic and Steve Smith | X/AustralianOpen

क्रिकेट

तसेच नंतर स्मिथने जोकोविचबरोबर क्रिकेटही खेळले.

Novak Djokovic | AFP

जोकोविचची गोलंदाजी

यावेळी जोकोविच स्मिथला गोलंदाजी करताना दिसला, जोकोविच एक चेंडू टाकताना चूकला, पण नंतर टाकलेला चेंडू स्मिथने प्रेक्षकांमध्ये भिरकावला.

Novak Djokovic and Steve Smith | X/AustralianOpen

जोकोविचची फलंदाजी

नंतर जोकोविचही फलंदाजी करताना दिसला, त्यानेही काही चेेंडू बॅटने जोरदार फटके मारत प्रेक्षकांमध्ये भिरकावले.

Novak Djokovic | X/AustralianOpen

भारत-अफगाणिस्तान संघात होणारी T20I मालिका कुठे अन् केव्हा पाहाणार?

India vs Afghanistan T20I | X/BCCI