Akshata Chhatre
हिवाळ्यात दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज पडते.
एका व्हायरल व्हिडिओनुसार, इंटरनॅशनल हायर स्कूल ऑफ मेडिसिनचा हवाला देत सांगितले आहे की, हिवाळ्यात रोज न आंघोळ केल्यास आयुर्मान ३४% वाढू शकते.
तज्ज्ञांच्या मते, दररोज आंघोळ केल्याने त्वचेच्या 'प्रोटेक्टिव्ह लेयर'चे नुकसान होते, ज्यामुळे सुरकुत्या पडणे आणि अकाली वृद्धत्व येण्याचा धोका वाढतो.
आपल्या शरीरावर काही चांगले बॅक्टेरिया असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवतात. अतिस्वच्छतेमुळे हे बॅक्टेरिया नष्ट होऊन पचन आणि हृदयावर परिणाम होऊ शकतो.
हिवाळ्यात दररोज आंघोळ केल्याने सोरायसिस, एक्झिमा आणि अतिशय कोरडी त्वचा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हिवाळ्यात स्वच्छ राहण्यासाठी दररोज आंघोळ करणे अनिवार्य नाही. आठवड्यातून ३ ते ४ वेळा आंघोळ करणे त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेसे आहे.
आता पुढच्या वेळी आईने न आंघोळ केल्याबद्दल विचारले, तर हे वैज्ञानिक कारण नक्की सांगा. आरोग्यासाठी थोडी 'आळशी वृत्ती' कधीकधी चांगली असते!