Norovirus: नोरोव्हायरसची 'महासत्तेला' धास्ती; जाणून घ्या किती खतरनाक?

Manish Jadhav

नोरोव्हायरस

चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवून दिला होता. यातच आता, नोरोव्हायरसने धास्ती वाढवली आहे.

Norovirus | Dainik Gomantak

अमेरिका

अमेरिकेत नोरोव्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. डिसेंबरपासून या विषाणूच्या 90 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे.

Norovirus | Dainik Gomantak

वेगाने प्रसार

नोरोव्हायरस हा एक रोग आहे, जो वेगाने पसरतो. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये नॉरोव्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.

Norovirus | Dainik Gomantak

माहिती

चला तर मग आज (2 डिसेंबर) या वेबस्टोरीच्या माध्यमातून नोरोव्हायरस किती खतरनाक आहे? त्याची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घेऊया...

Norovirus | Dainik Gomantak

गॅस्ट्रोएन्टेरिटिस नाव

नोरोव्हायरसचा पोट आणि आतड्यांवर परिणाम होतो. या कारणास्तव व्हायरसला 'गॅस्ट्रोएन्टेरिटिस' देखील म्हणतात.

Norovirus | Dainik Gomantak

लक्षणे

या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. काही प्रकरणांमध्ये, डोकेदुखी आणि सतत थकवा येण्याची समस्या देखील दिसून आली आहे.

sickness | Dainik Gomantak

संपर्क

हा रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. साधारणपणे, बहुतेक प्रकरणे दूषित अन्नाशी संबंधित असतात.

Norovirus | Dainik Gomantak

उपचार

नोरोव्हायरससाठी कोणताही निर्धारित उपचार नाही. रुग्णावर लक्षणांच्या आधारे उपचार केले जातात.

Norovirus | Dainik Gomantak

जुना आजार

नोरोव्हायरस हा एक दशक जुना आजार आहे. या विषाणूची पहिली केस 1968 मध्ये नॉर्वॉक, ओहायो येथील शाळेत नोंदवली गेली होती. त्यावेळी, सापडलेल्या स्ट्रेनला नॉर्वॉक व्हायरस असे म्हटले. नंतर त्याचे नाव 'नोरोव्हायरस' झाले.i

Norovirus | Dainik Gomantak
आणखी बघा