Pranali Kodre
आयसीसीकडून दरवर्षी सर्वोत्तम खेळाडूंना पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार देण्याआधी वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक विभागात नामांकन देण्यात येते.
त्यानुसार यावेळीही आयसीसीने 2023 वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना तिन्ही क्रिकेट प्रकारातील पुरस्कारांसाठी नामांकित केले आहे.
सर्वोत्तम उदयान्मुख पुरुष क्रिकेटपटू 2023 पुरस्कारासाठी रचिन रविंद्र (न्यूझीलंड), गेराल्ड कोएत्झी (द. आफ्रिका), दिलशान मदूशंका (श्रीलंका) आणि यशस्वी जयस्वाल (भारत) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम उदयान्मुख महिला क्रिकेटपटू 2023 पुरस्कारासाठी फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिय़ा), मारुफा अख्तर (बांगलादेश), लॉरेन बेल (इंग्लंड), जार्सी कार्टर (स्कॉटलंड) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम टी20 पुरुष क्रिकेटपटू 2023 पुरस्कारासाठी सूर्यकुमार यादव (भारत), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), अल्पेश रामजानी (युगांडा), मार्क चॅपमन (न्यूझीलंड) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम टी20 महिला क्रिकेटपटू 2023 पुरस्कारासाठी हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), चामरी अटापट्टू (श्रीलंका) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटू 2023 पुरस्कारासाठी शुभमन गिल (भारत), विराट कोहली (भारत), मोहम्मद शमी (भारत), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटू 2023 पुरस्कारासाठी ऍश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), चामरी अटापट्टू (श्रीलंका), नतालिया सायव्हर-ब्रंट (इंग्लंड), एमेलिया केर (न्यूझीलंड) यांना नामांकन मिळाले आहे.
सर्वोत्तम कसोटीपटू 2023 पुरस्कारासाठी ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया), उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), आर अश्विन (भारत), जो रुट (इंग्लंड) यांना नामांकन मिळाले आहे.
आयसीसीकडून सर गॅरी सोबर्स ट्रॉफी वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूला देण्यात येते. या पुरस्कारासाठी ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), रविंद्र जडेजा (भारत) यांना नामांकन मिळाले आहे.
आयसीसीकडून रेचल हेहोए फ्लिंट ट्रॉफी वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूला देण्यात येते.या पुरस्कारासाठी चामरी अटापट्टू (श्रीलंका), नतालिया सायव्हर-ब्रंट (इंग्लंड), ऍश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) यांना नामांकन मिळाले आहे.