Sameer Panditrao
गोव्यातील जत्रा स्टॉलशिवाय अपूर्ण असते!पारंपरिक गोडधोड विकणारे स्टॉल्स सर्वाधिक लोकप्रिय असतात.
गोव्यातील कोणत्याही जत्रेत सर्वाधिक खपणारा गोड पदार्थ म्हणजे ‘कड्डियो बड्डियो’ – एक खमंग आणि गोड चवदार पदार्थ, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्रिय आहे.
या जत्रांमध्ये खेळणी, कपडे, खेळ, आणि धार्मिक वस्तूंचेही स्टॉल्स असतात.
जत्रेतील स्टॉल्स पाहण्यासाठी संध्याकाळी जाणे चांगले, त्याच वेळी गर्दीही असते.
जत्रेच्या ठिकाणी गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे चारचाकीऐवजी दुचाकीने जाणे अधिक सोयीस्कर ठरते.
गोव्यातील कोणतीही जत्रा केवळ श्रद्धेचा भाग नसून, ती आनंद, खरेदी, आणि उत्साहाने भरलेली असते.
जर तुम्ही गोव्यात जत्रेला भेट दिली नसेल, तर ती नक्कीच घ्या! इथली चव, वातावरण आणि आनंद अपूर्व असतो.