Konkan Hidden Beach: डोळ्यांचे पारणे फिटेल! कोकणातील 'मिनी मालदीव' म्हणून ओळखला जाणारा 'हा' बीच तुम्ही पाहिला का?

Sameer Amunekar

नितळ पाणी

मालदीवप्रमाणेच निवती बीचवर पाणी इतके स्वच्छ आहे की समुद्राच्या तळाशी असलेली वाळू आणि छोटे मासे उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग

भारतातील सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग केंद्रांपैकी एक म्हणजे तारकर्ली. येथील समुद्रात असलेले रंगीबेरंगी प्रवाळ आणि समुद्री जीव पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

हाऊसयॉट आणि बॅकवॉटर्सचा अनुभव

केरळच्या धर्तीवर तारकर्लीमध्ये 'हाऊसयॉट' उपलब्ध आहेत. कर्ली नदीच्या शांत बॅकवॉटर्समध्ये रात्रीचा प्रवास करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

देवबागची सुवर्णभूमी

तारकर्लीच्या अगदी जवळ असलेल्या देवबाग येथे नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात. येथील 'सी-गल्स' पक्षी आणि डॉल्फिन सफारी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

सिंधुदुर्ग किल्ला

समुद्राच्या मध्यभागी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 'किल्ला सिंधुदुर्ग' येथून जवळच आहे. निसर्गासोबतच इतिहासाची साक्ष देणारे हे ठिकाण पर्यटनाची गोडी वाढवते.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

शांत आणि प्रदूषणमुक्त किनारे

मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील गजबजाटापासून दूर, भोगवे आणि निवतीचे किनारे अत्यंत शांत आहेत. येथे मालदीवसारखीच प्रायव्हसी आणि शांतता मिळते.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

अस्सल मालवणी मेजवानी

निसर्गासोबतच येथील जेवण ही एक मोठी मेजवानी असते. ताजी मासळी, सोलकढी आणि मालवणी मसाल्यात बनवलेले पदार्थ पर्यटकांच्या जिभेवर रेंगाळतात.

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak

शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? जाणून घ्या

Maratha History | Dainik Gomantak
येथे क्लिक करा