Maratha History: स्वराज्याचं पहिलं पाऊल, शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? जाणून घ्या

Sameer Amunekar

जन्म आणि ठिकाण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला.

Maratha History | Dainik Gomantak

सरदार

त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव राजमाता जिजाऊ होते. शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते.

Maratha History | Dainik Gomantak

बालपण आणि संस्कार

शिवरायांचे बालपण जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. त्यांना बालपणात रामायण, महाभारताच्या कथांतून शौर्याचे धडे मिळाले.

Maratha History | Dainik Gomantak

युद्धकलेचे शिक्षण

लहानपणापासूनच त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा आणि घोडेस्वारी यांसारखी शस्त्रविद्या आत्मसात केली, जी पुढे स्वराज्य रक्षणासाठी कामी आली.

Maratha History | Dainik Gomantak

स्वराज्याची प्रतिज्ञा

शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह (मावळ्यांसह) रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची पवित्र प्रतिज्ञा केली.

Maratha History | Dainik Gomantak

पहिला विजय - तोरणा किल्ला

वयाच्या अवघ्या १६-१७ व्या वर्षी शिवरायांनी १६४७ मध्ये विजापूरकरांच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले.

Maratha History | Dainik Gomantak

प्रचंडगड आणि पायाभरणी

तोरणा किल्ल्याचा विस्तार मोठा असल्याने महाराजांनी त्याचे नाव 'प्रचंडगड' ठेवले. याच विजयामुळे खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

Maratha History | Dainik Gomantak

कोकणातील 7 'हिडन जेम्स' जे तुमची ट्रिप अविस्मरणीय करतील

Hidden Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा