Konkan Tourism: परदेशात कशाला जाता? कोकणातच अनुभवा 'मिनी मालदीव'चा आनंद, पाहा 'हे' निसर्गरम्य ठिकाण

Sameer Amunekar

कोकण

कोकण म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेलं स्वर्गसुख! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रकिनारा पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

निळेशार समुद्र आणि पांढरी वाळू

निवती बीचवरील नितळ, निळेशार पाणी आणि पांढऱ्या रंगाची वाळू पाहताच मन प्रसन्न होतं. ही दृश्यं पर्यटकांना मालदीवची आठवण करून देतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

'मिनी मालदीव' नावामागचं कारण

स्वच्छ पाणी, शांत परिसर आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे निवती बीचला कोकणातील ‘मिनी मालदीव’ अशी ओळख मिळाली आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

निवती किल्ला

समुद्रकिनाऱ्यालगत डोंगरावर उभा असलेला निवती किल्ला हा इतिहासप्रेमींसाठी मोठं आकर्षण आहे. किल्ल्यावरून दिसणारा समुद्राचा नजारा मंत्रमुग्ध करणारा आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्सचा थरार

बोटिंग, जेट स्की, स्पीड बोट यांसारख्या वॉटर स्पोर्ट्समुळे साहसी पर्यटकांची पावलं निवतीकडे वळत आहेत.

Konkan Tourism | Dainik Gomantak

डॉल्फिन दर्शनाचा आनंद

निवती परिसरात बोटींगदरम्यान डॉल्फिन दिसण्याची शक्यता असते. हा अनुभव पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

मालवणी स्वादिष्ट जेवण

येथे मालवणी संस्कृती जवळून अनुभवता येते. ताजे मासे, मालवणी मसाल्याची चव आणि कोकणी आदरातिथ्य पर्यटकांच्या मनावर छाप पाडते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

किनारा

सकाळी व संध्याकाळी सूर्यकिरणांमुळे हा बीच सोनेरी रंगात न्हाल्यासारखा दिसतो. फोटोग्राफी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी ही जागा स्वर्गसमान आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

लहान मुलांच्या त्वचेवर चुकूनही लावू नका 'या' गोष्टी

Kids Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा