Sameer Amunekar
जर तुम्हाला गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवायचा असेल, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीच हा एक 'हिडन जेम' आहे. येथील पांढरी शुभ्र वाळू आणि निळाशार समुद्र जोडीदारासोबत फिरण्यासाठी अतिशय रोमँटिक वातावरण तयार करतो.
समुद्रकिनाऱ्याला लागूनच ऐतिहासिक निवती किल्ला आहे. या किल्ल्यावरून अरबी समुद्राचा अथांग विस्तार आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य दिसते. गर्लफ्रेंडसोबत फोटो काढण्यासाठी हे सर्वात बेस्ट स्पॉट आहे.
निवतीमध्ये पहाटेच्या वेळी डॉल्फिन सफारी मोठ्या प्रमाणात चालते. समुद्राच्या लाटांवर बागडणारे डॉल्फिन पाहणे हा तुमच्या ट्रीपमधील सर्वात अविस्मरणीय आणि आनंददायी क्षण ठरू शकतो.
निवती समुद्रात एक मोठा खडक आहे ज्याला 'गोल्डन रॉक' म्हटले जाते. सूर्याची किरणे जेव्हा या खडकावर पडतात, तेव्हा तो सोन्यासारखा चमकतो. हे निसर्गाचे अद्भुत रूप पाहणे तुमच्या डेटला अधिक खास बनवेल.
निवतीमध्ये केवळ समुद्रच नाही, तर सुंदर खाडी आणि बॅकवॉटर देखील आहे. नारळ-पोफळीच्या बागांमधून संथ वाहणाऱ्या पाण्यात बोटिंगचा आनंद घेणे अतिशय शांत आणि रोमँटिक वाटते.
कोकणात आलात आणि मालवणी जेवणावर ताव मारला नाही असे होणार नाही. निवतीच्या परिसरात असलेल्या होमस्टेमध्ये तुम्ही अस्सल मालवणी फिश थाली आणि सोलकढीचा आनंद घेऊ शकता, जो तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल.
निवती बीचवर जाण्यासाठी तुम्ही कुडाळ किंवा मालवण येथून खाजगी टॅक्सी किंवा बसने सहज पोहोचू शकता. मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांसाठी चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळ किंवा कुडाळ रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे पर्याय आहेत.