Manish Jadhav
अमेरिकेत पुढच्या वर्षी इलेक्शन होणार आहे. मात्र आतापसूनच राजकीय नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
अमेरिकेत मुख्यत:हा रिपब्लिक आणि डेमोक्रॅटीक या दोन पक्षांमधील नेत्यांमध्ये घमासान सुरु झाले आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये भारतीय वंशाच्या निक्की हेली आणि रामास्वामी यांच्यात राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे.
निक्की हेली आणि रामास्वामी यांच्यात डेबिटदरम्यान घामासान पाहायला मिळाले. दोघांनाही आपआपले मुद्दे ठामपणे मांडले.
रामास्वामी यांनी डिबेटदरम्यान निक्की हेली यांना फॅसिस्ट म्हणत आरोपांच्या फैरी झाडल्या. अमेरिकन लष्कराला युक्रेनमध्ये पाठवण्यावरुनही रामास्वामी यांनी हेली यांच्यावर निशाणा साधला.
रामास्वामी म्हणाले, मी निक्की हेली यांना X वर पोस्ट करत युक्रेनच्या तीन प्रांताची नावे विचारले. मात्र त्या तीन प्रांताची नावे सांगू शकल्या नाहीत.
निक्की हेली रामास्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. हेली म्हणाल्या, रामास्वामी यांच्या सारख्या लोकांनी विचारलेल्या फालतू गोष्टींकडे माझ्याकडे वेळ नाही. तसेच मी माझा अमूल्य वेळ यामध्ये खर्चही करु शकत नाही.