''ज्यू मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू...''

Manish Jadhav

इस्रायल-हमास युद्ध

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध अद्याप संपलेले नाही. युद्धविरामानंतर पुन्हा युद्ध सुरु झाले आहे.

Israel Hamas War | Dainik Gomantak

हमासच्या कमांडरचं मोठं वक्तव्य

ज्यू मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे हमासचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हानियाह याने म्हटले आहे.

Ismail Haniyeh | Dainik Gomantak

पाकिस्तान 'बहादूर' आहे

हानियाहने पाकिस्तानला बहादूर म्हटले. इस्रायलला पाकिस्तानकडून प्रतिकार झाल्यास क्रूरतेचे गुन्हे थांबू शकतात.

Ismail Haniyeh | Dainik Gomantak

पाकिस्तानकडे मागितली मदत

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान हानियाहने पाकिस्तानकडे मदत मागितली आहे.

Ismail Haniyeh | Dainik Gomantak

इस्रायलने ओस्लो कराराचे उल्लंघन केले

इस्रायलने ओस्लो कराराचे उल्लंघन केल्याचे हानियाहने म्हटले. विशेष म्हणजे, युद्धविरामानंतर इस्रायलने गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत.

Ismail Haniyeh | Dainik Gomantak

16,000 पॅलेस्टिनींना अटक

युद्धादरम्यान, सुमारे 16,000 पॅलेस्टिनींना अटक करणे आणि पवित्र स्थळांची विटंबना करणे यासह इस्रायलच्या कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करतात असे हानियाहने म्हटले आहे.

Ismail Haniyeh | Dainik Gomantak

आधुनिक शस्त्रास्त्रांचा मुकाबला

हमास इस्रायलच्या सर्वात आधुनिक शस्त्रास्त्रांचा मुकाबला करत असल्याचेही हानियाहने म्हटले आहे.

Israeli Army | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी