Akshata Chhatre
आपली त्वचा दिवसभर धूळ, घाण आणि प्रदूषणाच्या संपर्कात येते, ज्यामुळे त्वचेच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर नकारात्मक परिणाम होतो.
याशिवाय, दिवसभराच्या कामांदरम्यान चेहऱ्यावर तेल आणि घाम जमा होतो, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसते.
मेकअप केल्यानंतरही त्याचे अंश त्वचेवर राहतात, जे त्वचेच्या छिद्रांना अडकवतात आणि पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्सची शक्यता वाढवतात.
त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, चेहरा धुतल्याने त्वचेवर साचलेली घाण, तेल आणि अशुद्धता दूर होते, त्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते आणि ताजी वाटते.
स्वच्छ चेहर्यामुळे छिद्र खुले राहतात आणि त्यात जमा होणारी घाण बाहेर जाते. त्यामुळे मुरुम व ब्लॅकहेड्सची शक्यता कमी होते.
चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्याने अतिरिक्त तेल निघून जाते, पण त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. त्यामुळे त्वचा मऊ व हायड्रेटेड राहते.