Pranali Kodre
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने नुकताच महान पेले यांचा सर्वाधिक गोलचा विक्रम मागे टाकला आहे.
नेमारचा विक्रम
३१ वर्षीय नेमारने फिफा वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ब्राझीलकडून बोलिवियाविरुद्ध सामना खेळताना हा विक्रम नोंदवला.
या सामन्यात नेमारने दोन गोल केले. त्याने ६१ व्या आणि ९३ व्या मिनिटाला गोल केले.
त्यामुळे त्याच्या नावावर आता ब्राझीलकडून १२५ सामन्यांमध्ये ७९ गोल करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.
त्याचमुळे तो आता पेले यांना मागे टाकत ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
पेले यांनी ब्राझीलकडून ९२ सामन्यात खेळताना ७७ गोल नोंदवले होते.
दरम्यान ब्राझीलने बोलिवियाविरुद्ध ५-१ अशा गोलफरकाने विजय मिळवला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.