Pramod Yadav
केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झुआरी पुलाच्या दुसऱ्या बाजूचे लोकार्पण करण्यात आले.
झुआरी पुलावर 280 कोटी रुपये खर्चून 125 मीटर उंच निरीक्षण मनोरा बांधण्यात येणार आहे.
या निरीक्षण मनोऱ्याचे (व्हिविंग गॅलरी) बांधकामाची पायाभरणी देखील यावेळी करण्यात आली.
पर्यटकांना बोटीतून आणून कॅप्सुल लिफ्टमधून त्यांना मनोऱ्यावर नेण्यात येणार आहे. तेथून पर्यटकांना गोव्यातील समुद्र दर्शन घेता येईल.
पुढील सहा महिन्यांत राज्यात 10 हजार कोटींची रस्ता कामे सुरू होतील.
महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी तातडीने 100 कोटी देण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
गोवा ही देशाची पर्यटन राजधानी बनू शकते. त्यासाठी केंद्र सरकारकडून गोव्याला हवे ते सहकार्य करेल असेही गडकरी म्हणाले.