World Cup: सलग पाचव्यांदा न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये

Pranali Kodre

न्यूझीलंड उपांत्य फेरीत

न्यूझीलंड क्रिकेट संघाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 9 साखळी फेरीतील 5 सामने जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

New Zealand Cricket

पराक्रम

त्यामुळे न्यूझीलंडने सलग पाचव्यांदा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा पराक्रम केला आहे.

New Zealand Cricket

सलग पाचव्यांदा उपांत्य फेरी

न्यूझीलंडने 2007, 2011, 2015, 2019 आणि 2023 अशा सलग पाच वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामना खेळला आहे.

New Zealand Cricket

न्यूझीलंडचे उपांत्य सामने

तसेच त्यापूर्वी न्यूझीलंडने 1975, 1979, 1992, 1999 या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील उपांत्य सामना खेळला आहे.

New Zealand Cricket

10 वेळा उपांत्य सामने

म्हणजेच न्यूझीलंडने आत्तापर्यंत झालेल्या 13 वनडे वर्ल्डकपपैकी 9 स्पर्धांमध्ये उपांत्य सामना खेळला आहे.

New Zealand Cricket

उपविजेतेपद

त्यातील 2015 आणि 2019 असे गेल्या सलग 2 वर्ल्डकप स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने उपांत्य सामना जिंकून अंतिम सामना खेळला होता, मात्र दोन्ही वेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

New Zealand Cricket

अन्य तीन वर्ल्डकप

तसेच उर्वरित 1983 आणि 1987 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचे आव्हान साखळी फेरीतच संपले होते, तसेच 2003 साली सुपर सिक्समध्ये न्यूझीलंड 5 व्या क्रमांकावर राहिले. 1996 साली न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले.

New Zealand Cricket

सचिन नाही, तर पहिली ODI डबल सेंच्युरी ठोकलीये 'या' ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने

Belinda Clark | X
आणखी बघण्यासाठी