Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तो 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह 201 धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, मॅक्सवेल हा वनडेत द्विशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रिकेटपटू ठरला.
यापूर्वी 1997 महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्क हिने द्विशतक ठोकले होते.
विशेष म्हणजे तिनेही वनडे वर्ल्डकपमध्येच मुंबईतच खेळताना द्विशतक केले होते.
बेलिंडाने 1997 वर्ल्डकपमध्ये मुंबईत डेन्मार्कविरुद्ध खेळताना 155 चेंडूत 22 चौकारांसह नाबाद 229 धावा केल्या.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बेलिंडा क्लार्कने केलेले हे द्विशतक महिला किंवा पुरुषांच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक होते.
तिच्या द्विशतकानंतर 2010 साली सचिन तेंडुलकरने पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक केले.