Manish Jadhav
गोव्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर लोक न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी येतात.
तुम्ही गोव्यात न्यू ईयर सेलिब्रेशन करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी खास पर्वणी ठरेल.
न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी गोवा सज्ज झाला आहे. गोव्यातील पार्टी माहोल पर्यटकांना मोहिनी घालतो.
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी गोवा गजबजून गेला आहे. मन बावरं करणारं गोव्यातील वातावरण पर्यटकांना मोहवून टाकतं.
न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी 'गोवा' हे बेस्ट डेस्टिनेशन आहे, याकाळात गोव्यातील क्लब, कॅसिनो पर्यटकांनी फुलून जातात.
गोव्यातील पार्टी माहोलाव्यतिरिक्त इथल्या निसर्ग संपदेचा खराखुरा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमीही हजेरी लावतात. यंदाचं 'न्यू ईयर सेलिब्रेशन' गोव्याच्या निसर्गाच्या सानिध्यात असं निसर्गप्रेमी पर्यटकांचं मन म्हणू लागतं.