Manish Jadhav
पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला स्वर्ग तुम्ही नक्की पाहिला पाहिजे. होय, आम्ही इथे गोव्याबद्दल बोलतोय..
तुम्ही डिसेंबर महिन्यात गोव्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी गोवा पर्वणी ठरतो.
डिसेंबर महिना हा 2024 वर्षातील शेवटचा महिना आहे. नवं वर्ष साजरं करण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक गोव्यात येतात. मौज-मस्ती आणि बरंच काही गोवा पर्यटकांना नकळत देवून जातो.
तुम्ही खास 25 डिसेंबरसाठी गोव्यात नक्की गेलात पाहिजे. सांता क्लॉजचा माहोल तुम्ही तुमच्या समक्ष डोळ्यांनी पाहिला पाहिजे. सांता आणि नवं वर्ष तुम्ही गोव्यात नक्की एन्जॉय केलं पाहिजे.
गोव्यात येणारा पर्यटक इथल्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यापासून ते शांत समुद्रकिनाऱ्यांपर्यंतची सैर करतो.
डिसेंबर महिन्यातील गोव्याचा माहोल पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, 'मै मर नाऊ जाऊ...' पर्यटकांची दुनिया बनलेला गोवा मनाला पुन्हा-पुन्हा भावतो.