Manish Jadhav
स्कोडा इंडिया पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये त्यांची परफॉर्मन्स-ओरिएंटेड सेडान ऑक्टाव्हिया आरएस लवकरच लॉन्च करणार आहे.
सेडान सेगमेंटमध्ये शानदार परफॉर्मन्स आणि स्पोर्टी लूक पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हे मॉडेल एक मजबूत पर्याय बनू शकते.
कंपनी स्कोडा ऑक्टाव्हिया आरएस ही एकाच फुली-लोडेड व्हेरिएंटमध्ये लॉन्च करु शकते. ज्याला 'आरएस 265' असे नाव दिले जाऊ शकते.
या शानदार मॉडेलची एक्स-शोरुम किंमत सुमारे 49 ते 50 लाख असू शकते. या किमतीत ती बीएमडब्ल्यू 2 सिरीज, मर्सिडीज ए-क्लास, ऑडी ए4, टोयोटा कॅमरी आणि फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय सारख्या प्रीमियम सेडानशी थेट स्पर्धा करेल.
नवीन स्कोडा ऑक्टाव्हिया आरएसमध्ये 13-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, प्रीमियम साउंड सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस चार्जिंग सारखी अत्याधुनिक फीचर्स मिळू शकतात.
स्कोडा ऑक्टाव्हिया आरएस मध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल जे 265 पीएस पॉवर आणि 370 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. कंपनीचा दावा आहे की, ही कार केवळ 6.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवू शकते, तर तिचा टॉप स्पीड 250 किमी/ताशी मर्यादित असेल.