Sim Card Rule: सिम कार्ड खरेदीच्या नियमात बदल, थेट PMO कार्याकडून निर्देश, काय आहे नविन नियम?

Sameer Amunekar

नियमात बदल

जर तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल, तर त्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. कारण, आता सिम कार्ड घेण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

Sim Card Rule | Dainik Gomantak

बायोमेट्रिक पडताळणी

पीएमओनं दूरसंचार विभागाला (DOT) महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. यापुढं, सर्व नवीन सिम कार्ड कनेक्शनसाठी आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली जाईल.

Sim Card Rule | Dainik Gomantak

आता सिम कार्ड मिळविण्यासाठी, लोकांना त्यांचे आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. नागरिकांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीनं पडताळल्यानंतरच त्यांना सिमकार्ड मिळणार आहे.

Sim Card Rule | Dainik Gomantak

खोट्या कागदपत्रांचा वापर

खोट्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी करणे, फसवणुकीसह इतर गुन्ह्यांसाठी खोटी कागदपत्रं देण्यावर या निर्णयामुळं बंधन येणार आहे.

Sim Card Rule | Dainik Gomantak

सिम कार्ड खरेदी

यापूर्वी, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्टसारख्या कोणत्याही सरकारी कागदपत्राच्या आधारे नागरिकांना नवीन सिम कार्ड खरेदी करता येत होतं.

Sim Card Rule | Dainik Gomantak

तक्रारी

अनेक लोक बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी करत असल्याचं आपल्याला अनेकदा दिसून येत. त्यामूळं फसवणूकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळं पंतप्रधान कार्यालयानं दूरसंचार विभागाला निर्देश दिले आहेत.

Sim Card Rule | Dainik Gomantak
टोमॅटो खाण्याचे फायदे