Manish Jadhav
हिरोची नवी Glamour 125 लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. ही बाईक पुढील महिन्यात सणासुदीच्या काळात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
येणारी नवी Glamour 125 एक छोटे अपडेट नसून ती पूर्णपणे नेक्स्ट-जनरेशनच्या लूकमध्ये दिसेल, अशी चर्चा आहे.
या बाईकमध्ये एक मोठे आणि पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळेल, जे Hero Karizma XMR 210 सारखे असेल.
क्रूझ कंट्रोलची सुविधा
तसेच, या बाईकमध्ये 'क्रूझ कंट्रोल'सारखे मोठे फीचर दिले जाणार आहे, जे या सेगमेंटमध्ये (125 सीसी) पहिल्यांदाच पाहायला मिळेल.
त्याचवेळी, या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल-एसएमएस अलर्ट आणि यूएसबी चार्जिंग पॉइंट ही फीचर्स स्टँडर्ड म्हणून मिळतील.
बाईकमध्ये नवीन स्विचगियर देण्यात आले आहे, जे क्रूझ कंट्रोलला नियंत्रित करण्यासाठी मदत करेल.
लॉन्च झाल्यावर ही नवी बाईक Honda CB Shine सारख्या प्रतिस्पर्धकांना जोरदार टक्कर देईल.
बाईकच्या हार्डवेअरमध्ये (इंजिन) कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही, मात्र डिझाइनमध्ये मोठे बदल असतील.