Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक शूर योद्धे होते. त्यापैकीच एक मुरारबाजी देशपांडे होते.
मुरारबाजी देशपांडे मराठा साम्राज्याचे वीर होते. 1665 साली पुरंदरच्या लढाईत त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व केले. मोगलांविरुद्ध लढताना त्यांनी पराक्रमाची शर्थ केली.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या युद्धकौशल्यामुळे त्यांना मराठा सैन्यात दाखल करुन घेतले होते.
मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म चंद्रसेनिया कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. त्यांचे मूळ गाव जावळी (सातारा जिल्हा) होते.
1665 मध्ये मोगलांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. या लढाईत मुरारबाजींनी मराठा सैन्याचे नेतृत्व केले. त्यांनी मोगलांना जोरदार टक्कर दिली होती.
अवघ्या सातशे मावळ्यांनिशी मुरारबाजींनी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवले होते. तब्बल दीड महिना पुरंदर किल्ला या योद्ध्याने लढता ठेवला होता.
या लढाईत मुरारबाजींनी पराक्रम गाजवला, पण अखेर त्यांना वीरमरण आले.
मुरारबाजींची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आहे.