Manish Jadhav
आजकाल प्रेम आणि रिलेशनशिपच्या दुनियेत अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात. आतापर्यंत लोकांना सिच्युएशनशिप, टेक्स्टेशनशिप, फ्रीक मॅचिंग, फबिंगचा अर्थ नीट समजत नव्हता. यातच आता आणखी एका नवीन शब्दाची भर पडली आहे.
आता डेटिंगच्या सतत बदलणाऱ्या पद्धतींमध्ये ‘नॅनोशिप’चाही समावेश झाला आहे. चला तर मग नॅनोशिप म्हणजे काय, ते सध्या इतके चर्चेत का आहे आणि सामान्य डेटिंग पद्धतींपेक्षा नॅनोशिप कशी वेगळी आहे हे ते जाणून घेऊया...
अलीकडेच डेटिंग ॲप (टिंडर) ने 2024 चा 'इयर इन स्वाइप' रिपोर्ट जारी केला. टिंडर दरवर्षी असा रिपोर्ट प्रसिद्ध करते, ज्यामध्ये डेटिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल सांगितले जाते. 2024 च्या रिपोर्टमध्ये, आधुनिक डेटिंगबद्दल सांगितले गेले आहे. ज्यामध्ये ‘नॅनोशिप’ हा शब्द आला आहे.
या रिपोर्टसाठी 3 मार्च ते 18 मार्च 2024 दरम्यान 18-34 वर्षे वयोगटातील 8,000 लोकांचे (सिंगल आणि डेटिंग) सर्वेक्षण करण्यात आले. या 8,000 पैकी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून प्रत्येकी दोन हजार लोकांची निवड करण्यात आली.
प्रेमात पडलेले तरुण-तरुणी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. रोमान्सच्या छोटीशी म्व्हूमेंट देखील त्यांना आनंद देवून जाते. याच गोष्टीसच 'नॅनोशिप' म्हटले जात आहे.
नॅनोशिपमध्ये नात्याची जेवढ्या लवकर सुरुवात होते तेवढ्याच लवकर ते संपतेही. नॅनोशिप लॉंग टर्म असत नाही.