Akshata Chhatre
लग्नापूर्वी आणि नंतर, मुलीचे पालक तिला सासरच्या घरात कसे वागावे, कसे जुळवून घ्यावे याबद्दल अनेक सूचना देत असतात.
समाज सतत बदलत आहे, पण विचारसरणीत खरेच किती बदल झाला आहे? हा प्रश्न अजूनही महत्त्वाचा आहे.
आजही अनेक कुटुंबांमध्ये लग्नानंतर मुलींना अशा गोष्टी ऐकाव्या लागतात, ज्या त्यांना रुचत नाहीत.
अॅडजस्टमेंट करणे हे योग्यच आहे, पण अॅडजस्टमेंटच्या नावाखाली मुलींचा आत्मसन्मान चिरडला जात असेल, तर त्यावर नक्कीच विचार होणे आवश्यक आहे.
स्वयंपाकघरात सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत मुलीचा प्रवास अडकतो, अनेक वेळा तिच्या पालकांनाही हे जाणून घ्यावेसे वाटत नाही
घरगुती हिंसाचाराच्या घटना घडल्यावर सुद्धा बऱ्याच वेळा मुलीच्या कुटुंबाकडूनच तिच्यावरच समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातो "कसे तरी जुळवून घे, तो तुझा संसार आहे.
कोणत्याही स्वाभिमानी, सुशिक्षित मुलीला तिच्या पालकांकडून अशा सल्ल्यांची अपेक्षा नसते ज्यामध्ये तिची मतं ऐकून घेतली जात नाहीत.