Akshata Chhatre
तुमचं वय 35-40 चं आहे आणि त्वचा तरुण, मुलायम आणि चमकदार हवी आहे? तर घरच्या घरी मिळणाऱ्या खोबरेल तेलाचे हे उपाय नक्की करून पाहा!
3 चमचे नारळाचे तेल आणि 1 चमचा ऑलिव्ह तेल एकत्र करून रात्री चेहऱ्यावर लावा. सकाळी धुवून टाका. सुरकुत्यांपासून मुक्ती मिळते.
एलोवेरा जेलमध्ये दाह कमी करणारे गुण असतात. खोबरेल तेलात हे मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा शांत, थंड आणि ताजी राहते.
हे मिश्रण चेहरा आणि हातांवर लावल्यास त्वचेला खोल ओलावा मिळतो. कोरड्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
व्हिटॅमिन ई त्वचेला पोषण देते. खोबरेल तेलात याचे थेंब घालून नियमित लावल्यास त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
रात्री झोपण्यापूर्वी हे सर्व मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास रात्रभर नैसर्गिक उपचार होतात आणि त्वचा सकाळी ताजी दिसते.