Manish Jadhav
चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे, पण चहा प्यायल्यानंतर लगेच काही ठराविक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी विषारी ठरु शकते.
चहानंतर त्वरित लिंबू किंवा संत्री यांसारखे आंबट पदार्थ खाऊ नका. यामुळे ॲसिडिटी (Acidity) आणि पोटात गॅस (Bloating) होण्याची समस्या वाढते.
चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पाणी, बर्फाचे पेय किंवा शीतपेय पिणे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे पचनसंस्थेत मोठा बिघाड होऊ शकतो.
चहामध्ये 'टॅनिन' (Tannins) असते, ज्यामुळे पालक, बीन्स किंवा कडधान्ये खाल्ल्यास शरीरात लोहाचे शोषण (Absorption) थांबते. त्यामुळे चहा आणि लोहयुक्त पदार्थ यांच्यात अंतर ठेवा.
चहा पिऊन लगेच हळदीचा (Turmeric) वापर असलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे पोटात रासायनिक क्रिया (Chemical Reaction) होऊन त्रास होण्याची शक्यता असते.
तळलेले किंवा बेसनाचे पदार्थ (Fried Items) चहासोबत खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता (Constipation) वाढू शकते.
या 5 गोष्टी टाळल्यास केवळ पचनाच्या समस्याच नाही, तर शरीरातील पोषक तत्वांचे संतुलन राखण्यासही मदत होते.