Netaji Palkar: "10 वर्षे मुघल छावणीत, पण काळजात फक्त शिवराय!" वाचा सरसेनापती नेताजी पालकरांच्या शौर्याचा धगधगता इतिहास

Manish Jadhav

स्वराज्याचे दुसरे सरसेनापती

नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील अत्यंत विश्वासू सहकारी होते. मानकोजी दहातोंडे यांच्यानंतर महाराजांनी नेताजींची स्वराज्याचे 'सरसेनापती' म्हणून नियुक्ती केली होती.

Netaji Palkar | Dainik Gomantak

'प्रतिशिवाजी' पदवी

नेताजी पालकर हे युद्धकलेत इतके निपुण होते की शत्रू त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणून ओळखत असे. गनिमी काव्याने मुघल आणि आदिलशाही फौजांना त्यांनी अनेकदा सळो की पळो करुन सोडले होते.

Netaji Palkar | Dainik Gomantak

अफझलखान वधानंतरचा पराक्रम

प्रतापगडावर अफझलखानाचा वध झाल्यानंतर पळणाऱ्या विजापुरी सैन्याचा पाठलाग करुन नेताजींनी विजापूरपर्यंत धडक मारली होती. त्यांच्या या वेगवान हालचालींमुळे शत्रूमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.

Netaji Palkar | Dainik Gomantak

पुरंदरचा वेढा आणि औरंगजेबाचा दगा

पुरंदरच्या तहानंतर, मिर्झाराजे जयसिंगाच्या सांगण्यावरुन नेताजी मुघलांच्या मोहिमेत सामील झाले. मात्र, औरंगजेबाने दगाफटका करुन त्यांना अटक केली आणि दिल्लीला पाठवून दिले.

Netaji Palkar | Dainik Gomantak

सक्तीचे धर्मांतर आणि मुघल सेवा

दिल्लीत नेताजींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि त्यांचे नाव 'मुहम्मद कुली खान' असे ठेवण्यात आले. तब्बल 10 वर्षे त्यांनी मुघलांच्या सेवेमध्ये आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर लढाया केल्या.

Netaji Palkar | Dainik Gomantak

10 वर्षांनंतर स्वराज्यात पुनरागमन

इतक्या वर्षांनंतरही नेताजींच्या मनात स्वराज्याबद्दलची ओढ कमी झाली नव्हती. संधी मिळताच ते दक्षिणेत आले आणि पुन्हा शिवरायांच्या चरणी रुजू झाले. महाराजांनी मोठ्या मनाने आपल्या या जुन्या मावळ्याचे स्वागत केले.

Netaji Palkar | Dainik Gomantak

पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश

शिवाजी महाराजांनी त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यांनी नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण करुन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. ही घटना त्या काळातील सामाजिक चौकटी मोडीत काढणारी आणि महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणारी ठरली.

Netaji Palkar | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा