Manish Jadhav
भारताचा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याच्या शानदार कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याच्यामुळेच भारतात भालाफेक हा गेम लोकप्रिय झाला.
यातच आता, नीरजने दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे पॉट इन्व्हिटेशनल ट्रॅक स्पर्धा जिंकून शानदार सुरुवात केली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने आगामी डायमंड लीग स्पर्धेसाठी त्याचा आत्मविश्वास दुनावला आहे.
नीरजने वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर स्पर्धेत 84.52 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करुन सहा सदस्यांच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.
भारताच्या या स्टारने दक्षिण आफ्रिकेच्या 25 वर्षीय डुवे स्मिथला मागे सोडत 82.44 मीटरचा सर्वोत्तम फेक केला. तथापि, त्याची कामगिरी त्याच्या 89.94 मीटर या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा कमी होती, तर स्मिथ त्याच्या 83.29 मीटर या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ पोहोचला.
या स्पर्धेत केवळ दोन खेळाडू नीरज चोप्रा आणि डुवे स्मिथ यांनी 80 मीटरचा टप्पा ओलांडला. आणखी एक दक्षिण आफ्रिकेचा डंकन रॉबर्टसन 71.22 मीटरच्या प्रयत्नासह तिसऱ्या स्थानी राहिला.
नीरज त्याचे नवीन प्रशिक्षक जान झेलेझनी यांच्या देखरेखीखाली पॉचेफस्ट्रूममध्ये सराव करत आहे. झेलेझनी हे तीन वेळचे ऑलिंपिक चॅम्पियन आणि जागतिक विक्रमधारक आहेत.
27 वर्षीय नीरज 16 मे पासून दोहा डायमंड लीगमधील एलिट स्पर्धेत आपली मोहीम सुरु करणार आहे. त्याने 2020 च्या टोकियो (सुवर्ण) आणि 2024 च्या पॅरिस गेम्स (रौप्य) मध्ये सलग ऑलिंपिक पदके जिंकली. तो दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा एकमेव भारतीय भालाफेकपटू आहे.