नीरज चोप्रा अन् रॉजर फेडररची स्वित्झर्लंडला 'ग्रेट भेट'

Pranali Kodre

नीरज चोप्रा

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने नुकताच स्वित्झर्लंड दौरा केला.

Neeraj Chopra | Instagram

स्वित्झर्लंडला सुट्ट्यांचा आनंद

नीरज स्वित्झर्लंडला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. यादरम्यान एका कार्यक्रमानिमित्त तो 20 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररला भेटला.

Neeraj Chopra | Twitter

नीरज आणि फेडरर यांची भेट

नीरज आणि फेडरर यांची भेट झुरिचला झालेल्या एका कार्यक्रमात झाली. त्यांच्या भेटीचे फोटोही नीरजने सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.

Roger Federer

कॅप्शन

नीरजने या फोटोंच्या पोस्टला कॅप्शन दिले की 'खेळातील एका व्यक्तीला भेटणे, ज्याची कारकिर्द लोकांसाठी प्रेरणादायी आहे, हा एक सन्मान आहे. मला तुझ्याबरोबर बोलताना मजा आली आणि आशा आहे आपण पुन्हा भेटू.'

Neeraj Chopra Met Roger Federer | Instagram

खास भेट

या भेटीवेळी स्वित्झर्लंडच्या फेडररने नीरजला स्वाक्षरी करून टेनिस रॅकेट भेट दिली, तर नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्याची जर्सी फेडररला भेट दिली.

Neeraj Chopra Met Roger Federer | Instagram

स्पेशल मेसेज

नीरजने जर्सीवर लिहिले की 'तुला भेटण्याचा आनंद आहे, तुझ्या सल्ल्यांबद्दल आभार, मी त्यांचा वापर करेल.'

Neeraj Chopra Met Roger Federer | Instagram

स्वित्झर्लंड पर्यटनाचे अँबेसिडर

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की फेडरर आणि नीरज हे दोघेही स्वित्झर्लंड पर्यटनाचे अँबेसिडर आहेत.

Neeraj Chopra | Instagram

ब्रिस्बेन हिटने दुसऱ्यांदा पटकावलं BBL चे विजेतेपद

Brisbane Heat | X