ब्रिस्बेन हिटने दुसऱ्यांदा पटकावलं BBL चे विजेतेपद

Pranali Kodre

ब्रिस्बेन हिट विरुद्ध सिडनी सिक्सर्स

बिग बॅश लीग 2023-24 हंगाम नुकताच संपला. बीबीएलच्या या 13 व्या हंगामाचा अंतिम सामना 24 जानेवारी 2024 रोजी ब्रिस्बेन हिट विरुद्ध सिडनी सिक्सर्स संघात झाला.

Brisbane Heat | X

ब्रिस्बेन हिटचा विजय

सिडनीमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात ब्रिस्बेन हिटने सिडनी सिक्सर्स संघाचा 54 धावांनी पराभव केला आणि विजेतेपदाला गवसणी घातली.

Brisbane Heat | X

दुसरे विजेतेपद

ब्रिस्बेन हिटने दुसऱ्यांदा बीबीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Brisbane Heat | X

पहिले विजेतेपद

यापूर्वी ब्रिस्बेन हिटने दुसऱ्या हंगामात म्हणजेच 2012-13 च्या हंगामात बीबीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

Brisbane Heat | X/BBL

प्रथम फलंदाजी

13 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात ब्रिस्बेन हिटने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 166 धावा केल्या होत्या.

Brisbane Heat | X

पहिला डाव

ब्रिस्बेन हिटकडून जोश ब्राऊनने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली, तर मॅट रेनशॉने 40 धावा केल्या. सिक्सर्सकडून सीन ऍबॉटने 4 विकेट्स घेतल्या.

Seam Abbott | X

सिक्सर्स ऑलआऊट

सिक्सर्सचा संघ 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 17.3 षटकात 112 धावांवरच सर्वबाद झाला.

Sydney Sixers | X

दुसरा डाव

सिक्सर्सकडून कर्णधार मोझेस हेन्रिक्सने 25 धावा केल्या, तसेच जोश फिलिपने 23 धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणी 20 धावांचा टप्पा पार केला नाही. ब्रिस्बेनकडून स्पेन्सर्स जॉन्सनने 4 विकेट्स घेतल्या.

Spencer Johnson | X

सामनावीर

स्पेन्सर्स जॉन्सन सामनावीर ठरला.

Spencer Johnson | X

जेव्हा इंग्लंडने 12 वर्षांपूर्वी भारतात जिंकलेली कसोटी मालिका...

Kevin Pietersen | X/EnglandCricket
आणखी बघण्यासाठी