Side Effects of Neem Juice: फायद्याऐवजी होईल नुकसान! कडुनिंबाचा रस 'या' लोकांसाठी ठरू शकतो विषारी

Sameer Amunekar

गरोदर महिला

गरोदर महिलांनी कडुनिंबाच्या रसाचे सेवन टाळावे, कारण यामुळे गर्भाशयावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच स्तनपान करणाऱ्या मातांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

लहान मुले

लहान मुलांच्या शरीरासाठी कडुनिंबाचा अर्क खूप जड असू शकतो. यामुळे मुलांमध्ये उलट्या, जुलाब किंवा यकृताशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे त्यांना हा रस देऊ नये.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

किडनीचे विकार असलेले रुग्ण

ज्या लोकांना किडनीशी संबंधित गंभीर आजार आहेत, त्यांच्यासाठी कडुनिंबाचा रस विषारी ठरू शकतो. कडुनिंबातील काही घटक किडनीवर ताण निर्माण करू शकतात.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

शस्त्रक्रिया होणार असलेले रुग्ण

जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया (Surgery) होणार असेल, तर किमान दोन आठवडे आधी कडुनिंबाचा रस पिणे बंद करावे. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊन शस्त्रक्रियेदरम्यान अडचणी येऊ शकतात.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

डायबिटीस

कडुनिंब रक्तातील साखर वेगाने कमी करते. जर तुम्ही आधीच मधुमेहाची औषधे घेत असाल, तर कडुनिंबाच्या रसामुळे तुमची शुगर लेव्हल अतिशय कमी (Hypoglycemia) होण्याची भीती असते.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

वंध्यत्वावर उपचार

काही संशोधनानुसार, कडुनिंबाचा अतिवापर प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो. त्यामुळे जे जोडपे फॅमिली प्लॅनिंग करत आहेत किंवा वंध्यत्वावर उपचार घेत आहेत, त्यांनी याचे सेवन टाळावे.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

ऑटोइम्यून डिसीज

कडुनिंब रोगप्रतिकारशक्ती (Immune System) अतिशय सक्रिय करते. त्यामुळे ल्युपस (Lupus) किंवा संधिवात (Rheumatoid Arthritis) यांसारख्या ऑटोइम्यून आजारात त्रास कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते.

Side Effects of Neem Juice | Dainik Gomantak

चेहऱ्यावर हवाय नैसर्गिक ग्लो? सुरू करा 'हे' साधे ब्यूटी रूटीन

Natural Glow Beauty Routine | Dainik Gomantak
येथे क्लिक करा