Manish Jadhav
कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे पिंपल्स निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा मुळापासून नाश करतात.
ताज्या कडुनिंबाची पाने स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये बारीक वाटा आणि त्यात एक चमचा मुलतानी माती व थोडे गुलाबपा जल मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल (सीबम) नियंत्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे नवीन पिंपल्स येण्यापासून रोखता येतात.
जर चेहऱ्यावर लालसर मुरुमे असतील आणि वेदना होत असतील, तर हा थंडगार कडुनिंबाचा पॅक लावल्याने त्वचेला लगेच आराम मिळतो.
नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावर पिंपल्समुळे पडलेले काळे डाग आणि जुने वसांचे व्रण हळूहळू नाहीसे होऊ लागतात.
हा पॅक त्वचेच्या छिद्रांमधील घाण आणि कचरा खोलवर साफ करून त्वचा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत करतो.
हा फेस पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे सुकण्यासाठी ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने मसाज करत चेहरा स्वच्छ धुवून घ्या.