गोमन्तक डिजिटल टीम
कालपासून गोव्यात मखरोत्सवाला सुरुवात झाली. मखर म्हणजे मोठा लाकडी झोपाळा ज्याला फुलं आणि पताकांनी सजवलं जातं.
फोंड्यातल्या सातेरी मंदिरात काल मखरोत्सवाचा पहिला दिवस होता आणि या निमित्ताने देवीला सजवण्यात आलं.
मंदिरात सकाळी अभिषेक, महापूजा केली जाते तर दुपारी देवीला महानैवेद्य अर्पण केला जातो. जमलेले भाविक त्यानंतर प्रसादाचा लाभ घेऊ शकतात.
संध्याकाळी इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि मग मखरोत्सवाला सुरुवात होते.
नवरात्र हा गोव्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक असतो.
राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत फोंड्यात मखरोत्सवाची मजा अधिक असते.
तुम्ही जर का फोंड्यात असाल तर नक्कीच या उत्सवाला भेट द्या.