गोमन्तक डिजिटल टीम
मखरोत्सव फक्त देवीचाच होतो का? तर नाही!! महाखरोत्सव हा देवाचा देखील असतो.
याचं प्रमुख उदाहरण म्हणजे फोंड्यातील मंगेशीचे श्री मंगेश संस्थान.
साष्टी तालुक्यातील हे मंदिर पोर्तुगीजांच्या काळात अंत्रुज या तालुक्यात हलवण्यात आलं.
मंदिर दुसऱ्या तालुक्यात हलवल्यानंतर याच मंदिराचा दोनवेळा जीर्णोद्धार करण्यात आला.
मखरोत्सवाचा कार्यक्रम इथे सुद्धा साजरा केला जातो. देवीप्रमाणेच श्री मंगेशला देखील मखरात बसवून उपासना केली जाते.
गोव्यातील मखरोत्सव हा एक आगळावेगळा अनुभव असतो आणि तिथे गेल्याशिवाय याची अनुभूती येत नाही.
फोंड्यात देवीची अनेक मंदिरं आहेत त्यामुळे तुम्हाला जर का समुद्रकिनारे सोडून गोवा बघायचा असेल तर या मंदिरांना नक्कीच भेट द्या.