गोमन्तक डिजिटल टीम
सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांना गोव्यात भरपूर मान्यता दिली जाते. गोव्यातील कोंकणी भाषेत त्यांना गोंयचो सायब असंही म्हटलं जातं. मात्र सेंट झेवियर्स म्हणजे नेमके होते तरी कोण माहिती आहे का?
फ्रान्सिस्को डी जॅसो अझपिलिकुएटा हे सेंट झेवियर्स यांचं मूळ नाव आहे आणि त्यांचा जन्म 7 एप्रिल 1506 रोजी नावारे राज्याच्या झेवियर वाड्यात एका कुलीन कुटुंबात झाला.
ते कॅथोलिक मिशनरी आणि संत होते ज्यांनी सोसायटी ऑफ जीझसची सह-स्थापना केली. पोर्तुगीज साम्राज्याचे प्रतिनिधी म्हणून, जपानमध्ये पहिल्या ख्रिश्चन मिशनचे नेतृत्व सेंट झेवियर्स यांनी केले. 1534 मध्ये पॅरिसच्या मॉन्टमार्टे येथे शपथ घेणाऱ्या पहिल्या सात जेसुइट्सपैकी सेंट झेवियर्स एक होते.
6 मे 1542 रोजी ते गोव्यात पहिल्यांदा आले. पोर्तुगीज भारतातील मिशनरी कार्यात त्यांचा सहभाग होता. 1546 मध्ये, फ्रान्सिस झेवियर यांनी पोर्तुगालचा राजा जॉन (तिसरा) यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जेसुइट मिशनरी इन्क्विझिशनचा प्रस्ताव मांडला होता.
3 डिसेंबर 1552 रोजी त्यांचा शांगचुआन बेट, जियांगमेन, चीन येथे निधन झाले आणि त्यानंतर 11 डिसेंबर 1553 रोजी झेवियर यांचे पार्थिव गोव्याला पाठवण्यात आला.
गोव्यात आजही बॅसिलिका ऑफ बॉम जीझसच्या चर्चमध्ये त्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि दरवर्षी 3 डिसेंबरला इथे गोयच्या सायबाचे फेस्त आयोजित केले जाते.